गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे.विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर कला शाखेचा निकाल 88 टक्के लागला आहे.विज्ञान शाखेतून शार्दूल घोटकर याने 91.23 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक 82.15 टक्के गुण प्राप्त करून गणेश हिरादेवे याने पटकाविला.80.46 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक सौरभ पेंढारकर याने पटकाविला.कला शाखेतून प्रथम 86.15 टक्के गुण प्राप्त करून दामिनी लोहबडे,द्वितीय 83.38 टक्के गुण प्राप्त करून निलिमा ढवस तर तृतीय 80. 38 टक्के गुण प्राप्त करून राकेश चौधरी याने पटकाविला.विशेष म्हणजे विज्ञान व कला शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेले विद्यार्थी तालुक्यातही प्रथम आले आहे.एम.सी.व्ही.शाखेतून 72 टक्के गुण प्राप्त करून नागोराव मरसकोल्हे प्रथम 68.92 टक्के गुण प्राप्त करून सूरज मडावी द्वितीय तर 62 टक्के गुण प्राप्त करून आंचल लांडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयात करण्यात आला. अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विकास भोजेकर,रामचंद्र सोनपितरे,प्राचार्य कृष्णा बत्तुलवार,उपमुख्याध्यापिका स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार, पर्यवेक्षिका शोभा घोडे उपस्थित होत्या.विठ्ठलराव थिपे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश हमखास मिळते असे सांगितले.संचालन व आभार प्रदर्शन प्रा.आशिष देरकर यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचा उत्कृष्ट निकाल, विज्ञान शाखेतून शार्दूल घोटकर तर कला शाखेतून दामिनी लोहबडे तालुक्यातून प्रथम
Advertisements