रेल्वेबोगद्यात पाणि साचल्याने चिरादेवीकडे जाणारी वाहतूक प्रभावीत

0
123
Advertisements

भद्रावती, अब्बास अजानि

चिरादेवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वेबोगद्यात पावसाळ्यात दोन फुटापर्यन्त पाणी साचून राहत असल्यामुळे या मार्गावरील अनेक गावाकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली असून या गावाकडे जाणाऱ्या गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहेत.या गावकऱ्यांची अडचण समजून घेऊन संबंधित विभागांनी यावर उपाययोजना करून गावकऱ्यांची समस्या मार्गी लावावे अशी मागणी ग्राम सदस्या कडून होत आहे.
भद्रावती शहराच्या दक्षिणेकडे तालुक्यातील चिरादेवी,ढोरवास, पिपरी, तेलवासा, आदी गावे आहेत.या गावाकडे जाणारा रस्ता रेल्वेलाईन ओलांडून पुढे जातो. या रेल्वेक्रॉसिंगवर पूर्वि रेल्वे फाटक होते.मात्र रेल्वेने तिसरी लाईन टाकन्याचे काम सुरू केल्यानंतर सदर रेल्वे फाटक बंद करून बाजूलाच बोगदा काढून त्यातून हा रस्ता सुरू केला. मात्र रेल्वे लाईनचा खालचा भागात या बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दोन फुटापर्यंत पाणी साचून राहत असल्यामुळे तिथून जाणाऱ्या येणाऱ्या गावकऱ्यांना त्रास सहन करावे लागत आहे. साचलेल्या पाण्यासोबतच या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने आणखीनच स्थिती खराब झालेली आहे.या गावातील शेतकरी,विदयार्थी,व अन्य ग्रामसांना रोज तालुक्याच्या ठिकाणी कामानिमीत्ये जावे लागते.मात्र या ठिकाणी पाणी आणि गाळ साचलेल्या असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.अनेकदा या ठिकाणी जाणाऱ्या वाहतूकमुळे जाणाऱ्या वाहनाने अंगावर पाणी चिखल उडतो.अशावेळो कपडे खराब झाल्यामुळे त्यांना परत गावाकडे जावे लागते. ही स्थिती जवळपास चार महिने हा त्रास सहन करावे लागल्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी होते. व पावसाळा संपल्यानंतर या मात्र पुढल्यावर्षी सुद्धा हाच त्रास सुरू होते. ही नेहमीची समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी निकालात आणावी अशी मागणी या गावातील ग्रामसांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here