राखीव वनक्षेत्रात वाळू तस्करांचा थैमान, वन अधिकारी मात्र अनभिज्ञ

0
129
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्र हद्दीत मांडवा बेटातील टांगारा व सावल हिरा कम्पार्टमेंट नं.7 मधील वाहत्या नाल्यातून गेल्या कित्येक महिनांपासून टीपी नसताना शेकडो ब्रास वाळूची सर्रासपणे तस्करी होताना दिसत आहे.कोरपनासह परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्ते,नाली,घरकुल बांधकामात कंत्राटदाराकडून या वाळूचा वापर करण्यात येत असल्याचे बोलले जात असून वनक्षेत्रात ठिकठिकाणी अवैध साठवणूक केल्याने वाळूचे ढीग पडलेले दिसत आहे. यासंपुर्ण प्रकारात वन अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे आरोप होत असून वाळू तस्करीने कोलाम आदिवासींच्या शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्याची ओरड सुरू आहे.राखीव वनक्षेत्रात जेसीबच्या सहाय्याने वृक्ष व जमीनीची अक्षरशः नासधूस करीत रस्ता तयार करण्यात आला आणि अविरतपणे वाळूचा उपसा व तस्करी सुरू आहे.मात्र हा प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशनास का आला नाही याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.13 जुलैच्या मध्यरात्री जेसीबीद्वारे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच उपसंरक्षक यांच्या निदर्शनास वनविभागाचे भरारी पथक त्या ठिकाणी पोहोचण्या आधीच तस्करांनी यांत्रिक वाहनासह पोबारा केला.गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यातील बंधाऱ्यातून शेकडो ब्रास वाळू उपसा करून लंपास केली असताना 35 ब्रास रेतीचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे.वनक्षेत्रात झालेल्या नुकसानीचे पीओआर करण्यास विलंब का? लॉकडाऊन कालावधीत वाळू तस्करांचा थैमान सुरू असताना शुटींग का केली गेली नाही ? एखांदी बंडी जलतन लाकुड कुणी आणली तर तत्परतेने कारवाई करतात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असताना वनकर्मचारी अनभिज्ञ का ? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.वाळू तस्करांसोबत साटेलोटे असल्याच्या आरोपांना कमालीचे पेवफुटले असून याविषयी संशय व्यक्त होत आहे.यापूर्वी नदी घाटा वरून वाळू तस्करी होत आहे असे नुकतेच कोरपना येथील एका नगरसेवकाच्या ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करताना झालेल्या अपघातात निष्पाप आदिवासी मजुरांनी गवलेला जीव तर दुसऱ्या नगरसेवकाचा वाळूसह ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांनी जप्त करून दंडात्मक कारवाई केल्याच्या घटना वरून सिद्ध होते.यानंतर तहसीलदाराच्या कारवाईचा धसका घेत वाळू तस्करांनी आपला मोर्चा आता वनविभागाकडे वळवल्याचे चित्र असून वनविभाग याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहे.तस्करांच्या मोहरक्याचा शोध घेऊन संबंधित अधिकारी त्याच्यावर वन कायद्याचा बडगा उभारणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.दरम्यान यासंबंधी जनसत्याग्रह संघटनेचे सैय्यद आबीद अली यांनी उप वनसंरक्षकाकडे निष्पक्ष चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणल्याचे चित्र पहायला मिळत आहे.आता वनविभाग कोणावर आणि कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.फक्त चोर सोडून संन्याश्याला फाशी होऊ नये एवढीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here