सर्पदंश झालेल्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत द्या, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी 

0
110
Advertisements
चंद्रपूर : आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. साप हा शेतकऱ्यांचा मित्र समाजला जातो. पावसाळ्यात शेतीचे कामे सुरु होतात. शेतामध्ये बहुतांश वेळा सापाचे भ्रमण असते. अशावेळेस लाखों लोकांना शेतामध्ये व गावात सापाने चावा घेऊन मृत्यू होण्याच्या घटना वाढ होत आहे. आपल्या परिसरात नाग, घोणस, मण्यार, फुरण इत्यादी अतिविषारी साप असून यामुळे अनेक लोकांच्या उपचाराअभावी अथवा वेळेअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात. त्यात मोठ्या प्रमाणात कुटुंब उघड्यावर पडत असतात. त्यामुळे सर्पदंश झालेल्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत द्या अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१८ ला वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, कोल्हा, मगर, हत्ती यांच्या हल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना १५ लाखांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्या शासन निर्णयामध्ये साप, विंचू यांचा उल्लेख नसल्याने सापांमुळे मृत्यू झाल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे ते कुटुंब उघड्यावर पडत असते. आणि त्यांच्या संसार उध्वस्त होतो. सापाचा वन्य जीवांमध्ये समावेश करून दहा लाखाची आर्थिक मदत महाराट्र शासनाने जाहीर करावी अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. या मागणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here