गडचांदूर नगरपरिषदेत विरोधी पक्षाचे अस्तित्व नगण्य, केवळ एकच पक्ष सक्षम विरोधी, इतरांच्या भूमिका तटस्थ,चर्चेला उधाण

0
100
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूरची लोकसंख्या अंदाजे 40 हजाराच्या जवळपास असून मोठी बाजारपेठ व आजूबाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग असल्यामुळे हे शहर कमालीचे प्रसिद्ध झोतात आले आहे.2014 यावर्षी जुनी ग्रामपंचायत विसर्जित करून याठिकाणी नगरपरिषद उदयास आली.काही महिन्यापूर्वी येथे दुसऱ्यांदा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापन केली.यात काँग्रेसच्या सौ.सवीता टेकाम जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर राकाँचे शरद जोगी यांची उपाध्यक्षपदी वरणी लागली.भाजप 2, शिवसेना 5 आणि शेतकरी संघटना 1 हे नगरसेवक विरोधी बाकावर बसले.याच बरोबर काँग्रेस 1, शिवसेना 1अशे दोन स्वीकृत सदस्य आहे. नगरपरिषदेचा कारभार सुरू होताच “कोरोना” चे संकट उभे झाले.यामुळे गेल्या 3 महिन्यापासून शहराच्या विकास कामाला खीळ बसली.मात्र आता परिस्थीती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.यासर्व घडामोडी नंतर आता सत्ताधारी मैदानात उतरत असल्याचे चित्र असून विरोधी बाकांवर बसलेले नगरसेवकांचे अस्तित्व मात्र नगण्य दिसत आहे.याठिकाणी विरोधी पक्षातून भाजपचे नगरसेवक सक्षमपणे भूमिका बजावत विवीध मुद्यांवर आपले मत परखडपणे मांडत आहे.तर इतरांनी तटस्थ भुमिका घेतल्याचे अनुभवास मिळत आहे.नगरपरिषदेच्या निकाला नंतर मोठा पक्ष म्हणून शिवसेना याठिकाणी उदयास आला.लोकांना वाटत होते गडचांदूरात नसली तरी महाराष्ट्रात यांची सरकार आहे.मुख्यमंत्री,नगरविकास मंत्रालय त्यांच्या ताब्यात आहे.त्यामुळे येथे विरोधात असलेली सेना सक्षमपणे कामे करतील,अशी चर्चा सुरुवातीला ऐकायला मिळत होती.मात्र सध्याचे चित्र पाहून हे विरोधात आहे की सत्तेत, हेच कळेनासे झाले.लोकशाहीत जोपर्यंत विरोधी सक्षम नसतील तोपर्यंत विकासाला गती मिळत नाही असे बोलले जाते.मात्र याठिकाणी विरोधी पक्ष असूनही नसल्या सारखेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.आज घडीला नगपरिषदेचा कारभार पाहून नागरिक डोक्यावर हात ठेवतात.याठिकाणी कोणत्याही नागरिकाला कुठलाच मान नाही.एकच काठीने सर्वांना हाकले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.एकीकडे शासनप्रशासन नागरिकांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे याठिकाणी बिनधास्तपणे वाढदिवस,सत्कार,वर्धापनदिन साजरे केले जात आहे.तेव्हा यांना आपण विकास कामाकरिता निवडून दिले की सत्कार,वाढदिवस करण्याकरिता असा निर्वाणीचा प्रश्न नागरिकांनी उपस्थीत केला आहे.सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी नगरसेवकांसोबत सभा घेता येत नसल्याचे कारण पुढे करून मागील 4 महिन्यापासून सभा सुद्धा घेण्यात आलेली नाही.हे खरे असले तर वीस,पंचेवीस लोकांच्या जमावात यांना नगरपरिषदमध्ये सत्कार,वाढदिवस कसे का साजरे करता येते हे मात्र कोडेच बनले आहे.मागील तीन महिन्यापूर्वी सर्वसाधारण सभा घेण्यात आली तेव्हापासून एकही सभा घेण्यात आली नसल्याची माहिती असून याविषयी सत्ताधारी तर सोडाच विरोधी पक्ष नगरसेवक सुद्धा कमालीचे मोन धारण करून आहे.आम्ही यांना शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले होते की,असे कार्यक्रम साजरे करण्यासाठी ? अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.घडत असलेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी करूनही कारवाई तर दूरच साधी चौकशी सुद्धा होता नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अपमानीत होण्याच्या भीतीने नागरिक तक्रार घेऊन नगरपरिषदेत जाण्यास टाळत असल्याची आपबीती एका सुज्ञ नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवली आहे.आश्चर्यची बाब म्हणजे एकाही लोकप्रतिनिधीकडे याठिकाणी सुरू असलेली अरेरावीवर हस्तक्षेप करण्याची कुवत दिसत नसल्याने एकतर्फी कारभार सुरू असल्याचे चित्र आहे.विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून पुर्वीच्या काळात विरोधी नगरसेवकांची कामगिरी पाहता आताचे विरोधी निव्वळ फुसके बार ठरत असल्याची उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.केवळ भाजप या एकाच पक्षाचे नगरसेवक सक्षम व परखडपणे विरोधी भुमिका बजावत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत असून इतरांना केव्हा जाग येईल हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here