चंद्रपूर – लॉकडाउन काळात राज्य व जिल्हा प्रशासनाने काही नियमांसह शहरातील बाजारपेठ बंद ठेवली होती, नंतर अटीने आस्थापना सुरू करण्यात आली.
जीवनावश्यक वस्तू सह, आस्थापने, इतर दुकाने ठराविक वेळेस सुरू करण्यात आली.
काही काळ लोटल्यानंतर आता हॉटेल्सला सुद्धा सोशल डिस्टनसिंगचे नियमावली व ठराविक वेळेत सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी काही हॉटेल व्यवसायी प्रशासनाच्या नियमांना डावलण्याचे काम करीत आहे.
9 वाजेनंतर हॉटेल्समध्ये बैठक व्यवस्था नाही, परंतु शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील एका नवनिर्मित हॉटेल्समध्ये सर्व नियम डावलून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लोकांना बसून जेवण्याची सुविधा केली जाते.
इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी मद्यप्रेमींना दारू पिण्याची देखील व्यवस्था करण्यात येते.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, काम असेल तरच घराच्या बाहेर निघावे असे निर्देश जिल्हा प्रशासन नागरिकांना देत आहे.
परंतु अश्या हॉटेल व्यावसायिकांवर काही नियंत्रण असायला हवे, शासनाचे नियम धाब्यावर ठेवून मध्यरात्री पर्यन्त नागरिकांना बसवून जेवण्याची व मद्य पिण्याची व्यवस्था ती सुद्धा दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात प्रशासनाच्या डोळ्यावर धूळ फेकून होत आहे.
चंद्रपूर शहरातील हॉटेल्समध्ये “रात्रीस खेळ चाले”
Advertisements