शासनाने घरकुल धारकांना त्वरित अनुदान द्यावे, नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी

0
118
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहर हे तालुक्यातील इतर शहरांपेक्षा लोकसंख्येने जास्त असून शहराच्या आजूबाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिमेंट कंपन्या,कोलमाईन्स आहे.यामुळे एक मोठा मजूर वर्ग याठिकाणी वास्तव्यास असून कच्चे घर, झोपड्या,तुटपूंज्या पगारात आपापल्या कुटुंबांसह कसेबसे दिवस काढत आहे. अशातच पंतप्रधान आवास योजना उदयास आली.ज्यांना घर नाही अशा कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला.ही योजना बेघरांना एका अर्थी वरदानच ठरली.याच श्रेणीत गेल्या तीन वर्षापूर्वी स्थानिक नगरपरिषदेत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1200 च्या जवळपास गरजवंतांनी अर्ज केले. त्यापैकी पहिला DPR केवळ 77 लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले.35 लाभार्थ्यांनी रितसर नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी घेऊन आपले राहते घर खोलले.शासनाकडून अनुदान मिळतीलच या आशेने उसनवारी व खाजगी कर्ज घेऊन घरांचे बांधकाम सुरू केले.मात्र 1,2 सोडून बाकीची किस्त मिळाली नाही.कुणाचे घर स्लॅब लेवल तर कुणाचे निव्वळ भिंती उभ्या असल्याचे चित्र आहे.ज्या लाभार्थाचे बांधकाम स्लॅब लेव्हल पर्यंत आले.उर्वरीत किस्त मिळाली नाही त्यामुळे घरांचे बांधकाम अर्धवट पडले,आशातच पावसाळा सुरू झाला. मोठा पाऊस पडला तर त्या भिंती पण कोसळेल अशी शंका व्यक्त असून घर खोलून किरायाच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.आता किराया द्यावा की कर्ज व उसनवारीची रक्कम,या विवंचनेत लाभधारक सापडला आहे.मोठ्या आशेने नवीन घराचे स्वप्न बघीतले मात्र ते अर्धवट राहिल्याची खंत व्यक्त होत आहे.तेव्हा शासनाने या लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम देण्याची मागणी न.प.येथील भाजपचे नगरसेवक करीत आहे.तसेच नगरपरिषदेत हजारो लाभार्थ्यांनी अर्ज केले मात्र दुसरा DPR अजूनही मंजूर झालेला नाही.तरी शासनाने याकडे गाभिर्याने लक्ष देऊन जून्या लाभार्थ्यांना अनुदान द्याव नवीन मागणी करणाऱ्या लाभार्थाना घरकुल मंजूर करावे अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधितांना निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here