विक्की गुप्ता/प्रतिनिधी
घुग्घुस :- मागील 04 महिन्यापासून देशभरात Covid – 19 कोरोना विषाणूमूळे पसरलेल्या महामारी रोखण्यासाठी लागू असलेल्या ताळेबंदी हळू – हळू हटविण्यात येत आहे.
तर दुसरीकडे देशात संक्रमित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून आठ लाखाच्यावर संक्रमित रुग्ण असून जवळपास चोवीस हजार मृत्युमुखी पडलेले आहे.
यामुळे कोरोनाच्या दहशत अजून वाढत आहे.
रोजगार व्यापार अजूनही सुरळीत शुरू झालेले नाहीत यामुळे नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
अश्यातच घुग्घुस येथील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या कांचन विनोद कनोजीया यांनी आर्थिक तंगीमुळे प्रथमेश कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाचे मागील संपुर्ण शैक्षणिक सत्राचे शालेय फी भरुच शकले नाही.
यामुळे नवीन सत्रात शिक्षण घेण्यासाठी मुलाला कसे पाठवावे या विवंचनेत असलेल्या मातेने घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कोरोना योद्धा म्हणून मागील 03 महिन्यात गोरगरीब जनतेला सतत अनाजकीट वितरीत करून मददतीचा हात देणाऱ्या राजूरेड्डी यांना मदद मांगीतली असता मुलाचे शिक्षण बंद होता कामा नये म्हणून राजूरेड्डी यांनी मुलाला शिक्षणा करिता भरीव आर्थिक मदद दिली असता यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.