गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील गोरगरिबांना गेल्या वर्षी घरकुल मंजूर झाले.झोपडीत राहत असलेल्या लोकांनी पक्के घर असावे म्हणून या योजनेसाठी गेल्यावर्षी नगरपरिषदेकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करून नाव समाविष्ट केले आणि राहते घर उद्ध्वस्त करून कामाला सुरुवात केली.काहींचे घराचे बांधकाम पूर्ण झाले तर काहींचे अजुनही अर्धवट अवस्थेत पडून आहे.
पावसाळ्यात मला राहायची अजिबात व्यवस्था नाही,लहान लहान मुलबाळ असल्याने मी अर्धवट घर पुर्ण करण्यासाठी बचतगट व खाजगी कर्ज घेऊन स्लॅब टाकले.
अजूनही कुठल्याही प्रकारची फिनीशींग झाली नाही.अशा परिस्थीतीत सध्या मी राहत आहो.साहेब पहिले झोपडी होती तेव्हा शांतपणे झोप लागत होती,पण आता कर्जापाई स्लॅबच्या घरात झोप उडाली आहे.यामुळे असे वाटते “शासनाची योजना नकोरे बाबा” अशी माझी मनस्थिती झाली आहे.शासनाने आमची व्यथा जाणुन घेत लवकरात लवकर थकलेली रक्कम जमा करावी अशी विनंती वजा मागणी गडचांदूर येथील चुदरी लेआऊटच्या घरकुल धारकांनी News34 च्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.आता संबंधित याकडे केव्हा लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.