भद्रावतीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, रुग्णांची संख्या वाढूनही गांभीर्य नाही

0
74
Advertisements

अब्बास अजानी/भद्रावती

सध्या भद्रावती शहरात कोरोना बाधींतांची संख्या वाढतअसून शहरातील तीन परिसर सिल झाले असतांनासुद्धा सामाजिक अंतर पाडले जात नसून शहरात नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नसल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.
प्रशासनाने नागरिक व दुकानदार आणि विविध अस्थापणा प्रमुकांना कडक कारवाई चा इशारा देऊनही सर्शस नियमाचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. दि.13 जुलै रोजी येथील काही प्रतिष्ठानांमध्ये आणि कार्यालयात नागरिकांनी गर्दी करून सामाजिक अंतराचा फज्जा उडविला.प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे दुकानदारांनी आपल्या काऊंटर समोर दोरी बांधली,मात्र ग्राहक उभे राहतात .तसेच अनेक जण मास्क न वापरताच उभे राहतात रस्त्यानेही विना मास्क जाणाऱ्या नागरिकांची संख्या दरोज दिसून येते.
भद्रावती तेथील गांधी चौकातिल बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेच्या बाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला.अशीच स्थिती तेथील काही बँकांमध्ये आढळून आली.सामाजिक दुरावा राखुन व्यवस्थित अंतर पार पाडणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा आदर्श इतर बँकांनी का करू नये असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

Advertisements