भाजपतर्फे वनसडी BOI मॅनेजर व सहकाऱ्यांचा “कोरोना” योद्धा म्हणून सत्कार

0
101
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भाजपाच्या वतीने वनसडी येथील बँक ऑफ इंडिया(BOI)चे मॅनेजर शेख मंजूर हुसैन व सहकारी कर्मचाऱ्यांचा “कोरोना” योद्धा म्हणून एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे सत्कार करण्यात आला.तालुका भाजपाध्यक्ष तथा कन्हाळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण हिवरकर यांनी मॅनेजर शेख यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॅनेजर शेख यांनी लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन एका दिवसाचीही रजा न घेता सतत सेवा दिली.मोठ्याप्रमाणात कर्ज वितरीत करून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत दिली.मॅनेजर असल्याचा आव न आणता एका कर्मचाऱ्या सारखे स्वतः पुढे येऊन त्वरित लोकांची कामे करण्याला महत्व दिला.कोरोनाच्या धर्तीवर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत बँकेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरात लवकर कमे कशी होणार यावर अधिक भर दिला.अशाप्रकारे हिवरकर यांनी मॅनेजर हुसैन यांचे तोंडभरून कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर तर प्रमूख पाहुणे म्हणून मॅनेजर हुसैन सह पुरुषोत्तम भोंगळे,नारायण कोल्हे,मनोज गोरे,शेंडे,प्रेमजी,प्रमोद उपरे,सचिन कुळमेथे व इतर मान्यवरांची उपस्थीती होती. संचालन गोरे आभार भोंगळे यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमात भाजचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here