अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नका -विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
105
Advertisements

चंद्रपूर – अंतिम वर्षाच्या परीक्षा व बॅकलॉग रद्द व्हाव्या म्हणून आज जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची भेट घेतली. आणि त्यांच्या मार्फत मानव संसाधन मंत्री भारत सरकार, तसेच मुख्यमंत्री, म.रा. यांना या संदर्भात विद्यार्थ्यांतर्फे निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारने या संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवता राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता कोरोना महामारी ला लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. राज्य सरकारचा विद्यार्थी हिताचा या निर्णयाला संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थ्यांचा संपूर्ण पाठींबा आहे सोबतच आमच्या आरोग्य हिताकरीता उभी असलेली युवासेना, महाराष्ट्र कार्यकारिणी यांना सुद्धा आम्ही विदयार्थी म्हणून पाठिंबा दर्शवितो. परंतु 6 जुलै रोजी UGC नी नवीन Guidelines जारी करून विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकले.

Advertisements

UGC विद्यार्थ्यांचा आरोग्याची जबाबदारी घेऊन परीक्षा रद्द करावी अन्यथा विद्यार्थ्यांचा परीक्षेला तीव्र विरोध असणार, आणि याबाबत 31 जुलै पर्यंत UGC, मा. मानव संसाधन मंत्री केंद्र सरकार, अंतिम ठोस निर्णय घेतला गेला नाही तर राज्यभर तीव्र निषेध दर्शवला जाईल.

आधीच महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सुद्धा अंतिम वर्षाच्याया परीक्षा घेणार नाही या निर्णयावर आम्ही ठाम आहो असे स्पष्ट केले, जेव्हा परीक्षेला कुणी पर्यवेक्षक असणार नाही तर या परीक्षा होणार कश्या?

या संदर्भात आज चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी खेमणार यांना या परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी निवेदन दिले, विद्यार्थ्यांच्या या मागणीला युवा सेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here