गडचांदूरात त्या मुद्यावरून राजकारण तापायला सुरुवात, आठ ते दहा दिवसांत कायमस्वरूपी उपाय करू : उपाध्यक्ष जोगी, दिलेले आश्वासन फोल ठरतील : विरोधी पक्ष नगरसेवक डोहे

0
69
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठ्या व नावाजलेल्या गडचांदूर शहरातील नागरिक सध्या मोकाट जनावरे व सैरावैरा फिरणाऱ्या डुकरांमुळे हैराण असून यामुळे नगरपरिषदेवर कमालीचा रोष व्यक्त होत आहे.सदर समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी कित्येकदा निवेदने दिली मात्र थातूरमातूर कारवाई शिवाय दुसरे काहीच घडले नाही.सदर समस्येचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“मोकाट जनावरे व डुकरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने मी शहरवासीयांची माफी मागतो.कोरोना संकटामुळे याला वेळ लागला पण आता मी आणि नगराध्यक्ष,नगरसेवक, नगरसेविका,सभापतीगण यांनी यासाठी कर्मचाऱ्यांना निर्दोष दिले असून डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.येत्या 8,10 दिवसात सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढु व नगरवासीयांना यातून मुक्त करू,नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी News34 प्रतिनिधी पुढे व्यक्त केले आहे.”
“गेल्या 2 जुलै रोजी नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती यांनी सदर समस्येबद्दल एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर नागरिकांची पोस्ट पाहून “डुकरांचा बंदोबस्त करू” असे आश्वासन ग्रुपवर पोस्टद्वारे दिले होते. मात्र 10 दिवस होऊनही समस्या काही सुटली नसून त्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले.आता उपाध्यक्ष महोदय पुन्हा 8,10 दिवसात डुकरांचा बंदोबस्त करू,असे म्हणत आहे.मात्र ही माहिती खोटी व जनतेची दिशाभूल करणारी असून उपाध्यक्ष साहेब,कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे कर्मचारी कामात असल्यामुळे डुकरांचा बंदोबस्त होण्यास वेळ लागत आहे.असे सांगून जनतेची दिशाभूल करू नका.तुमच्या माहितीसाठी सांगतो नगरपरिषदेचे कर्मचारी डुकरं पकडत नसते.यांना पकडण्यासाठी राजूरा येथील एका व्यक्तीला नगरपरिषदेने ठेका दिला आहे त्यांना आदेश द्याना.नाहितर आपली कोणत्याही विभाग प्रमुख व प्रशासनावर वचक नाही हे तरी सांगा असा प्रश्न नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी News34 ला पाठवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थीत केला आहे.”
यासर्व घडामोडी पाहता शहरातील मोकाट जनावरे व डुकरांना घेऊन राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे पहायला मिळत असून थातूरमातूर कारवाई न करता संबंधितांनी सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी असे मत त्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here