सरकार नही सावकार है घोषणाबाजी करीत आप ने केली वीज बिलाची होळी

0
296
Advertisements

सिंदेवाही – “सरकार नही सावकार है” अशा घोषणा देत यामध्ये आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वीज बिलाची होळी करण्यात आली. आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनोहर पवार यांचे नेतृत्वात सिंदेवाही येथील शिवाजी चौकात ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी वीज बिलाची होळी करून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला.
कोरोणाच्या महामारीत राज्यात लाॅकडाऊन करण्यात आले आणि अनेकांचे रोजगार यामुळे बुडाले. लोकांच्या हाताला काम नसताना, पैसे नसताना, महावितरणने मात्र अधिक दर लावून तीन महिन्याचे एकत्रित कंबरडे मोडणारे बिल नागरिकांच्या माथी मारले. ही वाढ अन्यायकारक आहे त्यामुळे लाॅकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपकार्यकारी अभियंता महावितरण सिंदेवाही यांचे मार्फतीने या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार, शशिकांत बतकमवार सुरेश सोनवणे, गौरव शामकुडे, मीनाक्षी उंदीरवाडे, पी. कुमार पोपटे, जितेंद्र पेंदाम, आदर्श चहांदे, शांताराम आदे शेखर खिरडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here