भद्रावतीत बिबट्याचे धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
61
Advertisements

भद्रावती, अब्बास अजानी

भद्रावती येथील पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या मागील भागात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवून त्याला पळवून नेले.
या परिसरात बिबट्याने बस्तान मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बी एस एन एल कार्यलयाची भीत ओलांडून आयुध निर्मानीच्या तपासनी नाका पार करुन दोन बिबट बालाजी मंदिराकडे पसार झाल्याचे बघण्यात आले. थोड्यावेळातच ते पूजा टॉवर येथे आढळून आले.याबतची माहिती वानविभागाला देण्यात आली.लगेच वनविभागाचे पथक तसेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर घटनास्थळी पोहोचले वनविभागाने फटाके फोडून बिबट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ग्रामीण रुग्णालया जवळ एक इसम कुत्र्याला घेऊन फिरत असतांना बिबट्याने कुत्र्यावर घेतली व कुत्र्याला पोलीस स्टेशन मागील परिसरात घेऊन गेला. बिबट्याच्या धुमकुळामध्ये नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे पिंजरे लावून या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी भाजयुमोर्चे चे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here