कोरपना येथे “देवराव भोंगळे” यांच्या उपस्थीतीत भाजपची बैठक संपन्न, तालुक्यातील कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन

0
144
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थीतीत कोरपना तालुका भाजपची बैठक संपन्न झाली.यानिमित्ताने भाजपच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी देवराव भोंगळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर यांच्यासह उपस्थीत मान्यवरांनी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सदस्य अभियान तसेच इतर विषयांवर कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करत भोंगळे यांनी तालुक्याचा सखोल आढावा घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड.संजय धोटे होते तर उद्घाटन जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा,माजी आमदार सुदर्शन निमकर,युवामोर्चा जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे,राधेश्याम अडानिया नगरसेवक राजूरा,महेश देवकते युवा मोर्चा महामंत्री तथा पंचायत समिती उपसभापती जिवती,शिवाजी सेलोकर ज्येष्ठ नेते,पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,कवडू जरिले,संजय मुसळे,नत्थू ढवस,मनोहर कुळसंगे,किशोर बावणे, महेश शर्मा,नगरसेवक रामसेवक मोरे, महादेव एकरे,शशिकांत अडकीने,अमोल आसेकर, अबरार अली,बालू पानघाटे आदींची उपस्थीती होती.प्रास्ताविक हिवरकर यांनी तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here