पैसे मागितले म्हणून अश्लील शब्दात शिवीगाळ, शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाचा प्रताप

0
162
Advertisements

चंद्रपूर – शहरातील सिंधी पंचायत मैदानावर मागील अनेक वर्षांपासून शिवसेना दांडिया उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केल्या जाते.
या उत्सवात लाखो रुपये खर्च करून स्पर्धकांना विविध पारितोषिके दिली जातात.
परंतु वर्ष 2018ला या दांडियाच आयोजन मोठ्या थाटात करण्यात आलं होतं पण दांडिया उत्सवाचे आयोजक तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांनी केलं होतं, त्या दांडियात मंडप, डेकोरेशन व साउंड सर्व्हिसेस च काम नितीन अलोने या युवकाला देण्यात आलं होतं.
त्या कामाचे एकूण बिल 2 लाख 10 हजार रुपये झाले होते, माजी जिल्हाप्रमुखांनी अलोने याला 70 हजार आधीच एडवांस स्वरूपात दिले असल्याने पुढचे पैसे मिळणार यासाठी 10 दिवस त्या उत्सवात आपली सेवा पुरविली.
परंतु आज जवळपास त्या कार्यक्रमाला दीड वर्षे लोटले असताना अजूनही अलोने यांना उर्वरित रक्कम तब्बल 1 लाख 40 हजार मिळाले नसल्याने त्यांच्या घरची परिस्थिती बिघडली व त्या कारणाने नितीन अलोने यांनी सतीश भिवगडे यांना वारंवार पैश्याची मागणी केली परंतु आज देतो उद्या देतो असे म्हणत पैसे दिले नसल्याची माहिती अलोने यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
यावर्षी जगात व देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्याने सर्व क्षेत्रातील कामे ठप्प पडली आहे.
यामुळे अलोने हे सतीश भिवगडे यांना 11 जुलैला भेटून घरची परिस्थिती काय त्याबद्दल कल्पना देत पैसे देण्याची मागणी केली असता नितीनला अश्लील शब्दात शिवीगाळ करून धक्कामुक्की करण्याचा प्रकार केला असा आरोप अलोने यांनी भिवगडे यांचेवर केला आहे.
घडलेल्या प्रकारची मी पोलीस तक्रार केली आहे मला माझ्या मेहनतीचे पैसे देण्यात यावे अशी मागणी अलोने यांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here