राजगृहवरील हल्ल्याच्या आरपीआय (आ)कडून निषेध, आरोपींना तात्काळ अटक करा, ठाणेदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
68
Advertisements

गडचांदूर/प्रतिनिधी:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह बंगल्यात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने वस्तूंची तोडफोड केल्याचे प्रकरण घडले आहे.याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)तालुकाध्यक्ष प्रभाकर खाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार व ठाणेदार कोरपना यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आला आहे.सदर घटनेचा सर्वस्थरातून तिव्र निषेध व्यक्त होत असून या माथेफिरूंना तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष खाडेसह सरचिटणीस गौतम धोटे,उपाध्यक्ष गौतम भसारकर,मेघराज हरबडे,दर्शन बदरे, रमेश खाडे,नारायण कुळमेथे,अमोल वानखेडे,निखील ढवळे,काशीनाथ जिवने,प्रज्ञाशिल खाडे,संदीप खाडे आदी तालुक्यातील रिपब्लिकनचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here