अन्यथा मोकाट जनावरे व डुकरे नगरपरिषद आवारात सोडणार, मनवीसेचा इशारा

0
58
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठ्या व नावाजलेल्या गडचांदूर नगरपरिषदेच्या ढसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकात कमालीचा रोष पहायला मिळत आहे.इतर दिवसात तर सोडाच “कोरोना” काळातही शहरातील काही प्रभागात पसरलेली अस्वच्छता,मोकाट जनावरे व सैरावैरा फिरत असलेली डुकरे नागरिकांना अक्षरशः डोकेदुखी बनले आहे.सदर समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी कित्येकदा निवेदने दिली मात्र नगरपरिषद प्रशासनाने याकडे अघोषित दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अधिकार्‍याचे वर्तन पाहून हिटलरची आठवण येत असल्याची उपहासात्मक चर्चा सध्या नागरिकात सुरू असून “हम करे सो कायदा” अशी परिस्थीती याठिकाणी निर्माण झाली आहे. तक्रारकर्त्यांनाच हिनदर्जाची वागणूक मिळत असल्याने शहरात तक्रारी जास्त आणि समाधान कमी असे चित्र पहायला मिळत आहे. ढसाळ कारभाराने त्रस्त नागरिक सोशल मीडियाद्वारे नगरपरिषदेवर ताशेरे ओढत असल्याचे दिसत असून विवीध समस्यांना घेऊन तक्रारीचा ओघ सतत सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनप्रशासन स्वच्छतेवर अधिक भर देत असतानाच याठिकाणी मात्र परिस्थीती काहीशी वेगळीच अनुभवायला मिळत आहे.

अनेक निवेदने देऊनही काहीच होत नसल्याचे गृहीत धरून या समस्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष ऋषिकेश भारती यांनी नगरपरिषदेकडे निवेदन दिले आहे.
मागील कित्येक दिवसांपासून नागरिक निवेदन देऊन याचा पाठपुरावा करीत आहे मात्र अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिक वास्तव्य करीत असणाऱ्या वस्तीत डुकरांचे वास्तव्य असणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे असून याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन येत्या 8 दिवसांत सदर समस्या सोडवावी अन्यथा शहरात सैरावैरा फिरत असलेले मोकाट जनावरे व डुकरांना नगरपरिषदेच्या आवारात सोडण्यात येईल असा इशारा म.न.वि.से.शहराध्यक्ष भारती यांनी न.प.मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे दिला आहे.

News34 प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून संबंधितांकडून सदर समस्या विषयी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नेहमीप्रमाणे संपर्क झाला नाही. मात्र आता दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे जर न.प.ने समाधानकारक पाऊले उचलली नाही तर म.न.वि.से. खरोखरच डुकरे व मोकाट जनावरे न.प.च्या आवारात सोडणार का!याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here