कोलामांच्या हक्कांसाठी अखेरच्या श्वासपर्यंत कार्यरत राहील : वामनराव चटप , गडचांदूर येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

0
46
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरोना विषाणूच्या विश्व संकटात सर्व घटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभमीवर कोलाम विकास फाउंडेशनने कोलाम सहाय्यता अभियान सुरू केले. या अभियानात राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील ५६ कोलाम गुड्यांवरील १४८५ कुटुंबांना अन्नधान्य किट्स वितरित करण्यात आल्या. या अभियानाला पाठबळ देणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘”कृतज्ञता सोहळा” गडचांदूर येथे आयोजित केला होता.या सोहळ्यात बोलताना पत्रकार संजय तुमराम यांनी उपेक्षित घटकांकडे जागृत समाजाचे लक्ष न जाणे हे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते वामनराव चटप, विशेष अतिथी म्हणून पत्रकार देवणाथ गंडाते उपस्थित होते.कोलामांची ७२ वर्षापासून असलेली दुरावस्था भीषण आहे. कोलाम समूदायाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन व वामनराव चटप यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असल्याचे देखील पत्रकार संजय तुमराम म्हणाले. अध्यक्षस्थानी बोलताना वामनराव चटप म्हणाले की, तीनदा जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना कोलाम समाजाचे प्रश्न सोडविणे हे मिशन मी स्वीकारले.शाश्वत व रचनात्मक कार्य ही निरतंर चालणारी प्रक्रिया आहे. दरम्यान,सध्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असताना कोलाम विकास फाऊंडेशन,शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमातून सुरू झालेल्या या उपक्रमाला पाथ फाऊंडेशन,गुरुदेव सेवा मंडळ,डोनेटकार्ट आदी संस्थांनी हातभार लावला त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.तर कोलामांच्या हक्कांसाठी अखेरच्या श्वासपर्यंत कार्यरत राहील असे प्रतिपादन केले. याप्रसंगी शांतीगुडा व पाटागुडा या कोलाम गुड्यावरील कुटुंबांना खाद्यसामुग्री किट्स वितरित करण्यात आल्या.कृतज्ञता माहितीपत्रकाचे प्रकाशन पत्रकार संजय तुमराम यांच्या हस्ते झाले.यावेळी मंचावर प्रभाकर दिवे, निलकंठ कोरांगे,देवनाथ गंडाटे, अभिषेक भटपल्लीवार, कवडू,पोटे, मारोती येरणे, राजेंद्र जेनेकर,बिंदू गजभिये उपस्थित होते.

अँड.वामनराव चटप यांनी या अभियानाला भक्कम पाठबळ दिले.पाथ फाऊंडेशनचे एड.दीपक चटप,नाम फाऊंडेशन,डोनेटकार्ट,गुरुदेव सेवा मंडळ आदींनी केलेल्या सहकार्यातून हे अभियान पार पडले.त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा योजिला असल्याचे कोलम विकास फाऊंडेशनचे विकास कुंभारे यांनी प्रास्ताविकतेत सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोलाम विकास फाऊंडेशनचे संस्थापक विकास कुंभारे, संचालन पाथ फाऊंडेशनचे मुख्य संयोजक दीपक चटप तर आभार विमलताई कोडापे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी लक्ष्मण कुळमेथे,महेश देरकर,मारोती सिडाम,रोहित आत्राम आदींनी प्रयत्न केले.
——//——-
लॉकडाऊन काळात तब्बल १४८५ आदीम कोलाम कुटुंबांना मदतीचा हात लोकसहभागातून दिला.कोलाम विकास फाऊंडेशन व शेतकरी संघटना यांच्या पुढाकारातून झालेल्या अभियानात पाथ फाऊंडेशनला हातभार लावता आला,याचा मनस्वी आनंद आहे.
(दीपक चटप,मुख्य संयोजक पाथ फाऊंडेशन.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here