Advertisements
चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड हे वारंवार खडणी मागण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार उपप्रादेशिक अधिकारी शिंदे यांनी रामनगर पोलीस स्टेशनला दिली या तक्रारीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती.
या सर्व आरोपाचे खंडन राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी पत्रकार परिषद घेऊन केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,चंद्रपूर यांचे तर्फे मोटार वाहन निरीक्षक सुवोध नळकांडे यांनी दिनांक १४/०२/२०१९ रोजी प्रवासी बस क्र. MH-32B-2444 या वाहनाच्या मालकाने वाहनामध्ये अनधिकृतपणे विनापरवानगी फेरफार/बदल केला. तसेच नमूद वाहनाचे चेसीस मध्ये सुध्दा टेंपरींग केल्याचा संशय येत आहे, अशी तक्रार होती.
मुळात MH-32B-2444 या वाहनाचे मालक यांनी स्वतः हा गुन्हा दाखल होण्यापुर्वीच हे वाहन औरंगाबाद येथुन खरेदी केल्याबाबत तसेच झालेला व्यवहार यातुन त्यांची झालेली फसवणूक व त्यामुळे त्यांच्याकडून घडलेला गुन्हा याबाबत संपुर्ण माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांना दिलेली होती.
असे असतांना या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापुर्वी जप्त केलेले वाहन जवळपास पाच महिने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ताब्यात असतांना या वाहनासंबंधात कुठलाही तपास न करता पोलीस तक्रारीमध्ये सत्य माहिती दडवून शंका, संशयास्पद अशा वाक्यांचा शब्दप्रयोग करून कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांतर्फे तक्रार दाखल केली. त्यामुळे याप्रकरणात पोलीस यंत्रणेची दिशाभूल होवून हे प्रकरण फक्त वाहनाच्या इंजीन पूरते मर्यादित राहीले व त्या आधारेच संबंधीत वाहन मालकाने न्यायालयातून अटकपूर्व जामीण मिळविलेला आहे.
याप्रकरणाचा सखोल तपास केल्यास आपल्या निदर्शनास येईल की, या प्रकारणात जा केलेल्या वाहनाचे इंजिन हे MH-160-9009 या वाहनाचे आहे. वाहन मालक यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष दिलेल्या वयानाप्रमाणे जप्त केलेल्या वाहनाचा क्रमांक हा MH-20%A-8181 हा आहे. तसेच MH-32B-2444 या क्रमांकाचे मुळ वाहन हे Scrap झालेले आहे. विशेष म्हणजे यातील MH20AA-8181 या वाहनावर वाहन कराच्या स्वरुपात औरंगाबाद आरटीओ चा अंदाजे १२ लाख रुपयांचा कर थकीत असुन अनेक वर्षापासून हे वाहन Fitness करिता देखील कार्यालयात आले नसल्याचे निदर्शनास येईल. या प्रकरणात सर्वात आश्चर्यकारक तसेच परिवहन विभागाची संशयास्पद बाद म्हणजे जप्त केलेल्या दाहनाची परिवहन कार्यालयातील रेकार्ड वरिल लांबी व प्रत्यक्षात जप्त केलेल्या दाहनाची असलेली लांबी खुप मोठी तफावत आहे. हि बाब वाहनाच्या तांत्रिक माहितीचे तज्ञ असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून कशी सुटली याचा तपास होणे गरजेचे आहे.
संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी या प्रकरणात तक्रार दाखल करतेवेळी त्यांना अवगत असलेली सत्य माहिती तक्रारीत नमूद केली असती तर अशा प्रकारे वाहनांमध्ये फेरबदल करणाऱ्या टोळीस जेरबंद करणे पोलीस विभागास सहज शक्य झाले असते. परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तसे न केल्याने अशी अनेक वाहने रस्त्यावर धावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वतः आरोपाच्या कचाट्यात फसणार म्हणून चोराच्या उलट्या बोंबा शिंदे यांनी केल्या आहे खोटे आरोप करीत माझ्यावर तक्रार दाखल करून स्वतःची सूडबुद्धी त्यांनी सिद्ध केली आहे, जर मी त्यांना खंडणी मागितली असेल तर त्यांनी आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा मधील फुटेज दाखवावे.
पत्रपरिषदेत राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, सुनील काळे आदी उपस्थित होते.