Advertisements
चंद्रपूर – मागील दोन वर्षांपासून महाकाली कॉलनी, प्रकाश नगर येथील स्ट्रीट लाइट्स बंद पडून होत्या. या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे त्यांना रात्री येण्या-जाण्याचा खूप त्रास होत होता याची माहिती ती बसपाचे शहराध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांना मिळताच स्ट्रीट लाईटस चालू करण्याच्या संदर्भात मनपा महानगरपालिका “उपायुक्त पाटील साहेब “यांना प्रत्यक्ष भेटून महाकाली कॉलरी प्रकाश नगरातील समस्या सांगितली व निवेदन दिले या निवेदनाची दखल मनपा प्रशासनाने घेऊन स्ट्रीट लाईट सुरु केले.