२० जुलै पर्यंत सम्पर्क अभियान पूर्ण करा, भाजपा जिल्हाध्यक्ष भोंगळे यांची कार्यकर्त्याना सूचना

0
38
Advertisements
जिवती – कोविड १९च्या संकटात जनतेची सेवा आम्हाला करायची आहे.यात आ.सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनात भाजपा तर्फे जिल्ह्यात विविध मदतकार्याचे उपक्रम राबविले जात आहे.त्या कामांचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील पहिले वर्षपूर्ती संदर्भातील संपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी आलो असून हे अभियान २० जुलै पर्यंत पूर्ण करा असे आवाहन नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिवती येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना केले.
या वेळी माजी आ.ऍड संजय धोटे, नगराध्यक्ष हरिष शर्मा,माजी आ.सुदर्शन निमकर ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,महेश देवकते, केशव गिरमाजी,सुरेन्द्र केंद्रे,गोदावरी केंद्रे,अमर राठोड,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर देवराव भोंगळे यांनी त्वरित जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरवात केली आहे.आज शुक्रवार (१० जुलै)ला त्यांनी कोरपना,जिवती व राजुरा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.प्रत्येक बूथवर आरोग्य सुरक्षा किटचे वितरण, कुटुंबाची माहितीचे फॉर्म,व्हाट्स अप ग्रुप,आदि कामाला गती देण्याचे आवाहन करीत त्यांनी सम्पर्क अभियान २० जुलै पर्यंत पूर्ण करा असे आवाहनही केले.पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवावा या कडे ही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी जीवतीकरांनी भोंगळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.माधव नेवले पाटील,धनराज आडे,गोपीनाथ चव्हाण,विजय गोतावले, संजय पवार, भुते पाटील,सुधाकर राठोड, बालाजी माने आदींची यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here