चंद्रपूर :- पोभूरणा तालुक्यातील मोहाळा येथे राहणाऱ्या महिला शेतकरी सौ.उषाबाई रामदास बोडे यांच्या गट क्र.200 मध्ये 0.36 आर इतकी शेतजमीन असून यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत होती.
मोहाळा ते चिमणी, मोहाळा ते चेक नवेगाव येथील रस्त्याचे काम सुरू असतांना प्रशांत खोब्रागडे या ठेकेदाराने विना परवानगी शेतातील मुरूम खोदून नेले.
शेतात मोठं- मोठे खड्डे करून पूर्ण शेत नष्ट केले.
महिला शेतकऱ्यांनी या बद्दल ठेकेदाराला जाब विचारला असता तुला जे करायचे ते कर , जिथे जायचं तिथे जा माझं कोणी वाकडं करू शकत नाही अश्या शब्दात दमदाटी केले.
शेतजमिनीची नुकसान भरपाई करीता उषाताई यांनी पटवारी, पोलीस, तहसीलदार, जिल्हाधिकारी सर्वा पर्यंत न्याया करिता दाद मांगीतली मात्र कुठेच न्याय न मिळाल्यामूळे घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी
यांना दाद मांगीतली असता आज दिनांक 10 जुलै रोजी राजूरेड्डी यांनी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांची भेट घेऊन महिला शेतकऱ्यांची व्यथा पालकमंत्री साहेबा समोर मांडल्या व निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली असता.
पालकमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणात चौकशीचे दिलेले आहेत.
राजूरेड्डी यांच्यावर नागरिकांचा विश्वास हा दिवसागणिक वाढत असून इतर तालुक्यातील नागरिक ही मददती करिता हाक देत आहे.
त्या शेतकरी महिलेला न्याय द्या – घुग्गुस कांग्रेस शहर अध्यक्ष रेड्डी यांची पालकमंत्री वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे मागणी
Advertisements