आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना सानुग्रह अनुदान प्रदान

0
111
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राजूरा तालुक्यातील भुरकुंडा,भेंडवी येथे संतोष आलाम यांच्या शेतात सुनंदा सुधाकर बावणे (36) ही महिला शेतीच्या कामासाठी गेली असता एकाएकी विज कोसळून त्यात तीचा मृत्यू झाला.मृतकाला एक मुलगा,एक मुलगी आहे.मृतक सुनंदा बावणे विधवा होती व कुटूंबाचा भार तीच्यावरच होता.आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून सदर मृतक महिलेला तात्काळ मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.त्यानुसार मृतकाच्या कु.मोनिका व चि.अमन या मुलांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांचा धनादेश आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विट्ठलराव थीपे,नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,गटनेता तथा सभापती विक्रम येरणे,बिबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर,सभापती सौ.जयश्री ताकसांडे,शहर काँग्रेस अध्यक्ष रोहीत शिंगाडे,माजी सरपंच शिवकुमार राठी नगरसेवक राहूल उमरे,अरविंद मेश्राम,अर्चना वांढरे प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी,अहेमद भाई,शैलेश लोखंडे, कोवन काटकर, देवीदास मून,रुपेश चुदरी,राहूल ताकसांडे,रामचंद्र सोनटक्के,तलाठी गेडामसह इतरांची प्रामुख्याने उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here