“राजगृह” बंगल्यावरील हल्ल्याचा राकाँकडून निषेध, दोषींना कठोर शिक्षेची मागणी, तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन

0
52
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह बंगल्यात 7 जुलै रोजी अज्ञातांकडून झालेली तोडफोड प्रकरणी दोषींना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी गडचांदूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार व ठाणेदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.या तोडफोडीत सीसीटीव्ही कॅमेरे घराच्या काचा,मौल्यवान वास्तुंसह कुंड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले.सदर बंगला बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधले होते.जगभरातील आंबेडकर अनुयायी दररोज याठिकाणी भेटीला येतात.इतके महत्त्वाचे हे स्थान असून अशा कृत्यांमुळे देशातील आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना अक्षरशः दुखावल्या आहे.सदर घटना अत्यंत निंदनीय व अशोभनीय असून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे.ही केवळ राजगृहाची तोडफोड नव्हे तर समस्त आंबेडकरी चळवळीची तोडफोड असून गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी असे मत गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांनी व्यक्त केले आहे.निवेदन देताना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रीतीका ढवस,न.प.उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेविका अश्विनी कांबळे,नगरसेविका मिनाक्षी एकरेसह राकाँचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here