11 शिक्षकांची विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती, पुरोगामी शिक्षक समितीचा पाठपुरावा

0
109
Advertisements

चंद्रपूर- जिल्हा परिषद अंतर्गत विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या अनेक जागा शिल्लक होत्या त्याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने पाठपुरावा केला त्यानुसार नुकतेच 11 जागेवर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या अनेक जागा तालुक्यामध्ये रिक्त होत्या गोंडपीपरी, चिमूर सारख्या काही तालुक्यात तर एकाच विस्तार अधिकाऱ्याला गटशिक्षण अधिकारी व सर्व विस्तार अधिकाऱ्यांचा चार्ज सांभाळावा लागत होता त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत पुरोगामी शिक्षक संघटनेने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, पदोन्नती व अन्य मागण्या मान्य करण्यासाठी माहे मार्च मध्ये धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुद्धा संघटनेने केले त्यावेळी लवकरच पदोन्नती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासन संघटनेला प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते.
या सत्रात शाळा सुरवातीलाच पदोन्नती ची प्रक्रिया पार पाडल्यामुळे शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण आहे तसेच पदोन्नती झालेल्या शिक्षकांनी समाधान व्यक्त करत पाठपुराव्यासाठी संघटनेला धन्यवाद दिले आहे. विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती प्रक्रिया पार पाडल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी कर्डीले, शिक्षण अधिकारी दिपेंद्र लोखंडे, कक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघटनेच्या वतीने हरीश ससनकर, दीपक वरहेकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी, अनंता रासेकर, सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, विद्या खटी, सुलक्षणा क्षीरसागर, रजनी मोरे, पौर्णिमा मेहरकुरे, वैशाली दीक्षित, प्रतिभा उदापुरे, मनोज बेले, जगदीश ठाकरे, गंगाधर बोढे, संजय चिडे, संदीप कोंडेकर, वाहिद शेख, विनोबा आत्राम, रणजीत तेलकापल्लीवार, विक्रम ताळे, सुधाकर कन्नके, सतीश शिंगाडे, कैलास कोसरे, अतुल तिवाडे, जीवन भोयर, राजेंद्र घोरुडे, रामेश्वर मेश्राम, निरंजन गजबे, रवींद्र पाकमोडे, नरेंद्र डेंगे, विजय कुंभारे, नरेंद्र मुंगले, गोविंदा गोहणे, गणपत विधाते, संदीप चौधरी, रफिक शेख, नरेंद्र बोरीकर, सुनील जाधव, रोहिदास राठोड या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here