गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या मुंबई येथील “राजगृह” बंगल्यावर 7 जुलै रोजी दोन अज्ञात मनोविकृतांनी अनाधिकृतरीत्या प्रवेश करून तेथील साहित्याची तोड,फोड करत इमारतीला नुकसान पोहोचवले.याच्या निषेधार्थ 9 जुलै रोजी राजूराचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थीतीत गडचांदूर येथील डॉ.बाबासाहे आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.राजगृह बंगला हा अख्ख्या जगातील नागरिकांच्या आस्था व निष्ठेचा प्रतीक मानला जातो.दररोज मोठ्यासंख्यने नागरिक याठिकाणी येतात.सदर घटनेमुळे समाजमन अक्षरशः अस्वस्थ झाले असून प्रचंड आक्रोश निर्माण झाले आहे.अशा कृत्ये करणाऱ्या मनोविकृतांना जन्माची अद्दल घडविण्यासाठी यांना तात्काळ अटक करून कडक अशी शिक्षा व्हावी असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. उपस्थीतांनी सुध्दा सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा.विट्ठलराव थीपे,नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,गटनेता तथा सभापती विक्रम येरणे,बिबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर,सभापती सौ.जयश्री ताकसांडे,शहर काँग्रेस अध्यक्ष रोहीत शिंगाडे,नगरसेवक राहूल उमरे,प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी, अहेमद भाई,शैलेश लोखंडे,देवीदास मून, आशीष वांढरे,राहूल ताकसांडेसह इतरांची प्रामुख्याने उपस्थीती होती.
राजगृहावरील हल्ला ही नाथुराम गोडसे वृत्तीचा प्रकार – आमदार सुभाष धोटे
Advertisements