Breaking News

बुधवारला चंद्रपूर जिल्ह्यात 6 कोरोनाबाधित आढळले

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आज बुधवारी एकूण ६ बाधित पुढे आले आहे.सायंकाळी मूल तालुक्यातील एक युवक पॉझिटीव्ह आल्यामुळे दुपारपर्यंत पाच असणारी संख्या सहा झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधितांची संख्या एकूण १३० झाली असून यामध्ये चंद्रपूर येथे चाचणीत पॉझिटीव्ह निदान झालेले ४ राज्य राखीव दलाचे जवान आहे. त्यामुळे फक्त चंद्रपूर येथील बाधितांची संख्या जरी १३० झाली असली तरी एकूण जिल्हयातील बाधित १३४ झाले आहेत .
जिल्ह्यात 79 कोरोना बाधित आत्तापर्यंत उपचार घेऊन बरे झाले आहे तर 55 बाधितांवर उपचार सुरू आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील गडीसुरला या गावातील १९ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. हैदराबाद येथून हा युवक चंद्रपूर येथे आला असल्याचे कळते. ३० जून रोजी आलेल्या हा युवक गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी गावातील पॉझिटिव्ह ठरलेल्या युवकाच्या संपर्कात आला होता. १९ वर्षीय युवक मूल येथे संस्थात्मक अलगीकरणात होता. ७ जुलै रोजी या युवकाचे स्वॅब घेण्यात आला. ८ जुलैला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला .
तत्पूर्वी आज दुपारी पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा ६ तारखेला स्वॅब घेण्यात आला होता. ८ तारखेला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे आतापर्यत राज्य राखीव पोलीस दलाच्या चवथ्या जवानाचे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले आहे.
ऊर्जानगर मधील त्यापूर्वी आढळलेल्या एका बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये बाधितांची ६० वर्षीय आई व सात वर्षीय नात यांच्यासोबतच सोबत या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीचा देखील समावेश आहे.
आजच्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये वरोरा तालुक्यातील मोहबाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नागपूर येथून आल्यानंतर हा व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात न राहता एक दिवसासाठी घरी गेला होता. नंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब घेतला असता ते पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) ६ जुलै ( एकूण ७ ) आणि ८ जुलै ( एकूण ५ ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १३३ झाले आहेत. आतापर्यत ७९ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १३४ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ५५ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
× Send Your News