डॉक्टर्स डे च्या निमित्ताने कैदी बांधवांसाठी मानसिक आरोग्य जागरूकता व निदान शिबिराचे आयोजन

0
97
Advertisements

चंद्रपूर – तू बुद्धी दे, तू तेज दे , नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याची साथ दे ……
या कैदी बांधवांच्या प्रार्थनेच्या स्वरांनी चंद्रपुर जिल्हा कारागृह वर्ग 1 चे वातावरण भारावून गेले त्याला निमित्त होते ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून ‘मानसिक आरोग्य जागरूकता व निदान शिबिर ‘ आयोजनाचे.
एस आर एम कॉलेज ऑफ़ सोशल वर्क, चंद्रपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर नुकतेच आयोजीत करण्यात आले.

कोरोना संकटात आपण टाळेबंदीत आपापल्या घरात बंद झालोत आणि बऱ्याच जणांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले व लागत आहे हे लक्षात घेऊनच आमच्या एस आर एम कॉलेज ऑफ़ सोशल वर्क ने प्राचार्य डॉ सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनात डॉ जयश्री कापसे व डॉ देवेंद्र बोरकुटे यांच्या समन्वयकतेतून ‘ सहयोगी समुपदेशन केंद्र ‘ सुरु केलेले असून मानसिक आरोग्य क्षेत्रात पोस्टर , विडिओ , गटचर्चा , इत्यादी माध्यमातून मानसिक आरोग्य जागरूकता, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयतर्फे टेलीफोनिक समुपदेशनात सहभाग इत्यादी उपक्रम सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. यावेळी पुरुष कैदी यांना आय एम ए चे अध्यक्ष ड़ॉ माडुरवार, डॉ मंगेश गुलवाडे यांनी कोरोना प्रतिबंध यावर तर डॉ किरण देशपांडे , डॉ प्रा जयश्री कापसे यांनी मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले तसेच या वेळी महिला कैदी यांची शारीरिक तपासणी डॉ नसरीन मावानी, डॉ प्राजक्ता अस्वार, डॉ शर्मीली पोद्दार, डॉ प्रीती चव्हाण यांनी तर मानसिक आरोग्य तपासणी व समुपदेशन समुपदेशक सोनम रायपुरे, किनारा खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रा देवेंद्र बोरकुटे यांनी केले. या सर्व आयोजना साठी कारागृह प्रशासन यांनी सहकार्य केले. तुरुंगाधिकारी श्री वैभव आगे व वैद्यकीय अधिकारी डॉ अमित डांगेवार यांचे विशेष आभार मानले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here