चेक पोस्ट समोरील भगदाडामुळे नागरिकांच्या जीवास धोका, दुरुस्तीसाठी शिरीज कुमारांचा पुढाकार

0
57
Advertisements

चंद्रपूर – बहुजन समाज पार्टी शहर शाखेच्या वतीने आज दिनांक ०७/ ०७/ २०२० ला सबएरिया साहेब व मॅनेंजर सोहब महाकाली कॉलरी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले वेकोलि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला जाणाऱ्या रस्त्यावर व महाकाली कॉलरी खोळसा खदान CHP /Check post च्या समोर मोठे भगदाड पडले असून रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे वित्तहानी तसेच जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

रस्त्यावर पडलेल्या भगदाडातून दोन-तीन अपघात सुद्धा झाले. आनी त्या रस्तयात लाईट सुद्धा बंद पडल्या आहे या विषयाला घेऊन बहुजन समाज पक्षाचे शहर अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांचे नेतृत्वात सब एरिया साहेब रयतवारी कॉलरी चंद्रपूरला निवेदन देऊन चर्चा करण्यात आली, सब एरिया अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन बसपा पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी बसपाचे शहर अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, शहर उपाध्यक्ष प्रशांत रामटेके तसेच सागर वर्गणे सिद्धांत गडपावार ,आनंद सुंदिला, प्रीतम बोबडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here