बहुजन समाज पक्षाचे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
204
Advertisements

चंद्रपूर – बहुजन समाज पार्टी तर्फे परम आदरणीय सुप्रीमो बहन कुमारी मायावतीजीच्या दिशा निर्देशानुसार पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मा.खासदार विरसींग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड मा.संदिप ताजने साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 07 जुलै 2020 मंगळवार महाराष्ट्रातील शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेस,व कांग्रेस सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचा वतीने धरणे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीच्या राज्यकारभाराला वैतागलेल्या राज्यातील जनतेने कोणालाही बहुमत दिले नाही त्यामुळे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे त्रिकूट सरकार अस्तित्वात आले.
हि सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्यातील जनतेला पश्चाताप झाला आहे हे त्रिकूट सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यासाठी व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी *बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या* वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणा प्रदर्शन करण्यात आले या धरण्यामधे खालील मागण्या होते.
*मागण्या*
*1]* राज्यात दलित,आदिवासींवर होणारे अत्याचार त्वरित थांबविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे. व हे खटले जलदगतीने न्यायालयात चालवून या खटल्यात तज्ञ विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी व दोषींना तात्काळ दंडीत करावे.

*2]* कोरोना संक्रमित रुग्णांना मोफत उपचार व *1,00,000/-* (एक लाख) आणि कोविड-19 मृत पावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना *10,00,000/-* (दहा लाख) नुकसान भरपाई देण्यात यावी.

Advertisements

*3]* राज्यातील इंधन दरवाढ त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करावी.

*4]* कोरोनामुळे लाँकडाउन केलेल्या काळातील व पुढील तीन महिन्याचे विज बिल माफ करावे.

*5]* शैक्षणिक वर्षे 2019-20 व 2020-2021 चे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करावेत व विद्यार्थ्यांना विशेष सवलती व शिष्यवृत्ती द्यावी.

*6]* कोरोनामुळे ठप्प झालेले लघू उद्योग,बांधकाम मजूर,बारा बलुतेदार यांना विशेष सवलती व अनुदान दयावे.

*7]* सर्व जिल्हानिहाय सुपर स्पेशालिटी हाँस्पिटलची कायमस्वरुपी बांधणी व संचालन करावे.

*8]* राज्यातील शेतकऱ्यांना नविन अनुदान,कर्ज व बि-बियाणे त्यांचा बांधावर उपलब्ध करून दयावे.

*9]* गृह कर्ज,वाहनकर्ज,तारणकर्ज,सुक्ष्म उद्योग कर्ज बचत गट कर्ज यांचे सहा महिन्याचे हफ्ते माफ करणे.

*10]* रिक्शा,टॅक्सी,टेम्पो व मालवाहतूक दारांचे महिन्याचे कर्ज हफ्ते करून त्यांना रोकड अर्थसहाय्य करावे.

*11]* बोगस बी-बियाणे बनवून शेतकर्‍यांना फसविणार्या कंपन्यावर गुन्हे दाखल करुन त्यांचे परवाने रद्द करावे.

*12]* डिसेंबर 2020 पर्यंत सर्वाना मोफत धान्य देण्यात यावे.

*13]* चंद्रपूर जिल्ह्यात WCL च्या खाजगी कंपन्यात व अन्य कंपनी / कारखान्यात 80% प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करून देण्यात यावे.

*14]* चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन यावर रोख लावण्यात यावे व सर्व रेती तस्करावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

*15]* चंद्रपूर जिल्ह्यातील झोपडपट्टी वासीयांना घराचे स्थानिक पट्टे देण्यात यावे.

16] दाताळा रोड बायपास वरील नवनिर्मित उडाणपुलाला हिराई किवा बिरसा मुंडा उडाणपूल असे नाव देण्यात यावे.

17] सावली तालुक्यात अनुसूचित जाती जमाती व ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय मुला मुलींचे वसतीगृह सावली याठिकाणी देण्यात यावे.
या सर्व मागण्या घेवून महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रकांत मांझी, जिल्हा प्रभारी मुकद्दर मेश्राम, जिल्हा अध्यक्ष विक्रांत झामरे, जिल्हा सचिव विनित एस.तावाडे, जिल्हा सदस्य धर्मेश निकोसे, राजेश कुंभलवार, चंद्रपूर शहर अध्यक्ष शिरीजकूमार गोगुंलवार, उपाध्यक्ष राजेंद्र रामटेके, संजय खोब्रागडे, सरफराज शेख, महेंद्र चुनारकर, सुधीर चवरे, पुर्वचंद्र गेडाम, विशाल दुर्योधन, प्रविण मेश्राम, चंदु गुर्ले, आसिफ शेख, मनोज जांभुळे, प्रभुदास पुणेकर व इत्यादी सर्व बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उपस्थितीत हा धरणा प्रदर्शित करीत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले व या निवेदनावर जातीने लक्ष देवून लवकरच मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले या शब्दाचा मान ठेवत बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात आलेले एक दिवसीय धरणा प्रदर्शन थांबविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here