गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर मास्कचे वापर,सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन शासनप्रशासन स्तरातून वारंवार केले जात असतानाच कित्येक ठिकाणी याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने नगरपरिषद प्रशासन शहरातील नागरिकांना नियम कायदे सांगतात वेळप्रसंगी चालन सुद्धा करतात मात्र दुसऱ्यांना कायद्याचे डोस पाजणारे स्वत: मात्र पालन करताना दिसत नाही.सविस्तर असे की,गेल्या 26 मे रोजी गडचांदूर नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी प्रमोद वाघमारे यांचा वाढदिवस CO सह नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,नगरसेवकांनी नगरपरिषदेत साजरा केला.मात्र यानंतर कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालया बाहेर मोठा जल्लोष केला.एकमेकांना केक लावणे,गळाभेट देणे हे प्रकार सर्रासपणे पहायला मिळाले.यासर्व घडामोडीत मात्र कर्मचाऱ्यांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग ह्या शासनाच्या नियमांची अक्षरशः ऐशीतैशी केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे मात्र हे नियम फक्त नागरिकांनाच लागु आहे का असा निर्वाणीचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.सामान्य नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले तर हीच मंडळी चालान करतात मग आता यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.काही दिवसापुर्वी रात्रीच्या सुमारास न.प.चे काही कर्मचारी व काही नगरसेवक रेस्ट हाऊसमध्ये पार्टी करत असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे भीम आर्मीच्या मदन बोरकर यांनी CO डॉ.विशाखा शेळकी यांना दिली असता मॅडमनी बोरकर यांनाच चांगले धारेवर धरले होते.”माझे कर्मचारी जेवण करत आहे जेवण” असे सांगून “तुम्ही भेटा मग दाखवते कसे असते सोशल डिस्टंसिंग” अशी धमकीच दिली होती.फोटो,व्हिडिओ असल्यास दाखवा अशाप्रकारे पुरावा मागणाऱ्या CO मॅडम बघा आता फोटो आणि करा कारवाई असे म्हणाची पाळी आली असून नगरपरिषदेचे गोडवे गाणाऱ्यांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात कोरोनाचे योद्धाच जर अशाप्रकारे शासन नियमांची ऐशीतैशी करत असेल तर सर्वसाधारण नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शहरवासीयांना नानाप्रकारे वेठीस धरणारे बेजबाबदार व कर्तव्यदक्षतेचा आव आणून प्रसिद्धी करत शासनाला अंधारात ठेवणारे हे कर्मचारी आणि दरवेळी यांना पाठीशी घालणाऱ्या CO यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.आता याविषयी जिल्हाधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
घ्या आता पुरावा…! गडचांदूर न.प.कर्मचाऱ्याकडून शासन नियमांची ऐशीतैशी, मास्क, सोशल डिस्टंसिंग फक्त नागरिकांसाठी,अनेकांना पडला प्रश्न
Advertisements