विकासकामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षाकडून संपर्क प्रमुख राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन

0
45
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे काल चंद्रपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर,गडचांदूर भागाचा दौरा केला त्यात त्यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला.नांदा फाटा येथील महिला कार्यकर्त्या जोसना त्रिकारवार,शोभा ढवस,आणि युवा कार्यकर्ते महेश राऊत,राजेंद्र अन्नाला,राजेश तिरणकर यांनी मंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला असून पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत विविध ग्रामीण भागाच्या समस्या जाणून घेतल्या
कोरपना तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी आपल्या तालुक्यातील समस्या निवेदनातून मांडल्या असून मौजा नांदा ते आसन नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असून शेतकऱ्यांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत असून त्या पुलाची शेतकऱ्यांना अत्यंत गरज असून सदर कामाला जलसंधारण विभागाची मंजुरी असूनही अजून पर्यंत सुरू झाले नसल्याबाबाबत, मौजा नांदा ते पल्लेझरी,अंदाजे 2 किमी पांदण रस्त्याची मागणी,मौजा नांदा ते काढोली अंदाजे 3 किमी पांदण रस्त्याची मागणी,मौजा राजूरगुडा ते धामणगाव अंदाजे 3 किमी पांदण रस्त्याची मागणी,तसेच नांदा ग्रा. प.अंतर्गत फाटा येथील वार्ड क्र.५ मधील अनधिकृत अतिक्रमण काढण्याबाबत,तसेच नांदा येथे व्यापारी संकुलनाचे बांधकाम करण्याबाबाबत,नांदा फाटा मुख्य मार्गाच्या दोन्ही नालीचे बांधकाम करून दुभाजक बनवून सौन्दर्यीकरन करण्याबाबत इत्यादी समस्या निवेदनातून नुकत्याच नियुक्ती झालेल्या राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रितिका ढवस यांनी राज्याचे राज्यमंत्री तथा नगरविकास, ऊर्जा,तंत्रशिक्षण,आपत्ती व्यवस्थापण,मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here