चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रांगणात मंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा, सामान्य नागरिकांवर कारवाई मग यांना सूट का?

0
143
Advertisements

चंद्रपूर – देशात राज्यात व जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहे, अनेक नागरिक या विषाणूमुळे मृत्युमुखी पडले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकार, जिल्हा प्रशासन अनेक उपाययोजना करीत आहे, नागरिकांना वारंवार सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टनसिंग चा वापर करण्याच्या सूचना देत आहे परंतु काही नागरिक या नियमाला चक्क वाकुल्या दाखवीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दौऱ्यावर आले असताना विविध विभागासह आढावा बैठक आटोपल्यावर त्यांचा ताफा चंद्रपूर शहर महानगरपालिके कडे वळला परंतु त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते मात्र नियमांना डावलून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडविताना दिसले.
गांधी चौकात पालिकेचे कोरोना संदर्भात जनजागृती पोस्टर लागले आहे, परंतु जर मंत्र्यांच्या ताफ्यातचं नियमांचे उल्लंघन होत असतील तर यांचेवर कारवाई काय होणार?
काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त मोहिते यांनी शहरातील दुकानात जाऊन सोशल डिस्टनसिंग नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली, ऑटो चालक थुंकत असताना दंड थोपटला तर मग मंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये नियम मोडल्या गेले त्यांच्यावर काही कारवाई झाली का?
सामान्य नागरिकांवर कारवाई तर मग यांचेवर का नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here