लग्नात गेलेलं जोडपं कोरोना पॉझिटिव्ह, त्या जोडप्यामुळे भद्रावती शहर 3 दिवस बंद

0
153
Advertisements

भद्रावती – चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

या पार्श्वभूमीवर एका लग्न समारंभात गेलेलं जोडपं हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली, लग्न समारंभ व त्या जोडप्याच्या संपर्कात आलेले 61 नागरिकांना कोरेन्टाईन करण्यात आले आहे.

Advertisements

हे जोडपं 5 जुले ला कोरोना पॉझिटिव्ह आढळलं होत.

7 जुलै ते 9 जुलै पर्यन्त भद्रावती शहर बंद असणार आहे, या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.

जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी नेहमी मास्कचा वापर करावा व नागरिकांनी सुद्धा मास्क व सोशल डिस्टनसिंग चा वापर करावा असे आवाहन भद्रावती नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

आदेशाचे पालन न करणार्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here