शहरातील भिवापूर वार्डातील 30 वर्षीय महिला व पोम्भूर्णा येथील 21 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यत ६२ कोरोनातून बरे, ६१ बाधितांवर उपचार सुरू

0
25
Advertisements

चंद्रपूर  – चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी २ पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२३ वर गेली आहे.
नव्या २ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरमध्ये आली होती. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह आला आहे.
दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या १२३ झाली आहे. आत्तापर्यंत ६२ जण कोरोना आजारातून बरे झाले असून ६१ संक्रमितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) आणि ६ जुलै ( एकूण २ ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १२३ झाले आहेत. आतापर्यत ६२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १२३ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ६१ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here