कुसुंबीच्या आदिवासींची न्यायासाठी टॉवरवरून विरूगीरी, माणिकगड सिमेंट कंपनीचा अन्याय शिगेला, प्रलंबित मागण्यांची पूर्तता कधी

0
11
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
माणिकगड सिमेंट कंपनीच्या बहुचर्चित जमीन भुपृष्ठ घोटाळ्याचा लढा न्यायलयापर्यंत पोहचला आहे.प्रशासनाने सुरूवाती पासूनच याप्रकरणाकडे काणाडोळा केल्याने जमीनीचे मालक “शाहु असताना चोरा सारखे” वावरत आहे.आदिवासींच्या शेतजमिनी नष्ट करून अविरत चुनखड्डी उत्खनन केल्याची अनेक तक्रारी शासनप्रशासन स्तरावर देण्यात आली मात्र साध्या चौकशीचे सौजन्य दाखविले नाही.कित्येक निवेदने धूळखात पडले असून अन्यायग्रस्त 14 आदिवासी कोलाम बांधवांचे भूपृष्ठ अधिकार भूसंपादन शेतकऱ्यांची संमती प्रक्रिया न करता तत्कालीन महसुल अधिकार्‍यांच्या संगनमताने वर्ष 2013 मध्ये आदिवासी कुंटूबांच्या 7/12 नमुन्यात 2 इतर अधिकार नियमबाह्य माणिकगड माईन्स अशी नोंद घेऊन आदिवासींच्या अधिकारावर घाला घातल्याने मात्र अन्यायाचे बळी आदिवासी ठरले तसेच शेत जमीनीचा मोबदला दिला नाही,नोकरी दिली नाही 1984 च्या अवार्ड व भुसंपादन अहवालात नाव आणि जमिनीचा उल्लेख नसताना बेकायदेशीर उत्खनन व आदिवासींच्या जमिनीवर कंपनीचा कब्जा कसा ? असे आरोप करत यामुळे आदिवासींची फसवणूक तर झालीच सोबत शासनाच्या कोट्यावधींचा महसुलावर पाणी फिरल्याची खंत आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.अनेक तक्रारींच्या तलाठी अहवाल असताना सुद्धा वरिष्ठ कार्यालय कारवाई करण्यासाठी पुढे सरसावले नाही.यामुळे जमिनीसाठी आदिवासीयांचा संघर्ष सुरू आहे.मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही असा पवित्रा सध्या कुसुंबीच्या आंदोलनकर्त्यांनी घेतला असून प्रशानाचे अधिकारी याठिकाणी पोहोचले आहे. पोलिस बंदोबस्त चोख असून महादेव कुळमेथे,रामदास मंगाम,जैराम कुळमेथे,सागर एडमे,गणेश सिडाम या टॉवरवर चढलेल्या आदिवासी आंदोलनकर्त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here