दारू तस्करांकडून साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिसांचे धाडसत्र सुरूच

0
23
Advertisements

भद्रावती, अब्बास अजानि

एक चारचाकी वाहनाव्दारे देशीदारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन युकांना गजाआर्ड केले असून त्याच्याकडून 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान दोन इसम सिल्वर कलरच्या इंडिका विष्टा गाडीने चंदनखेडा मार्गे भद्रावती येथील विजय नगराळे रा. सुमठाणा यांच्या घरी अवैधरित्या देशी दारू आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या नुसार पोलिसांनी नगराळे यांच्या घरावर पाळत ठेवली.तेव्हा सदर वर्णनाची गाडी नगराळे यांच्या घराजवळ आली त्या गाडीने गाडीतील दोन इसमानी गाडीच्या मागील सीटवर ठेवलेल्या तीन पिशव्या उतरवून नगराळे यांच्या घरात ठेवल्या ते गाडीजवळ आल.त्यावेळी पंचासमक्ष या दोन इसमांना ताब्यात घेतले.त्यांची अधिक चौकशी घेतली असता.महेश जीवतोडे रा.गौतम नगर व प्रजोत तामटकर रा.बेळगाव अशी त्याचे नावे असल्याचे कळले गाडीची झडती घेतली असता 60 हजार रुपये किमतीच्या 600 नग रॉकेट संत्रा देशी दारूच्या शिष्या आढळून आल्या तसेच एक मोबाईल व गाडी 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच नगराळे याच्या घराची झडती घेतली असता 90 हजार 900 शिष्या संत्रा देशी दारू आढळून अली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्याचा कलम 65(अ),(ई) 83 व भा.द.वी 188 कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि.सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि.अमोल तुळजेवार यांनी आपल्या सहकाऱ्यासह केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here