Advertisements
चंद्रपूर – शुभेच्छांच्या वर्षावात भाजप महानगर अध्यक्षांना डावलले या आशयाची बातमी न्युज34 वर झळकताच उपमहापौर राहुल पावडे यांनी ते बॅनर खाली उतरविले.
2 दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून देवराव भोंगळे तर चंद्रपूर महानगर अध्यक्ष म्हणून डॉ मंगेश गुलवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांनी शहरात शुभेच्छांचे बॅनर लावले, परंतु उपमहापौर राहुल पावडे यांनी जिल्हाध्यक्ष भोंगळे यांचा शुभेच्छा करणारे बॅनर शहरात लावले असताना त्या बॅनर मध्ये महानगर अध्यक्ष गुलवाडे यांना स्थानचं दिले नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज तर नाही, गुटबाजीचे हे संकेत तर नव्हते अशी चर्चा रंगली होती.
त्या शुभेच्छा बॅनर ची बातमी news34 वर झळकताच उपमहापौर पावडे यांना आपली चूक लक्षात आली व तात्काळ ते बॅनर खाली उतरविण्यास सांगितले.