शुभेच्छांच्या वर्षावात भाजप महानगर अध्यक्ष गुलवाडे यांना डावलले, गुलवाडे यांच्या पदावरून गुटबाजीचे संकेत?

0
263
Advertisements

चंद्रपूर – विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार नाना श्यामकुळे यांना पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर श्यामकुळे यांनी चंद्रपूरला कायमचा रामराम ठोकत नागपूर प्रस्थान केले.

श्यामकुळे हे भाजप चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुद्धा होते, त्यांच्या नंतर ही जबाबदारी कुणावर द्यायची याचा पेच भाजप वरिष्ठ नेत्यांना पडला तब्बल वर्षभरातील कार्यक्रमांचा आढावा घेत भाजपने जिल्हाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी डॉ मंगेश गुलवाडे यांची नियुक्ती केली.

Advertisements

देवराव भोंगळे हे भाजपचा जुना चेहरा असल्याने ते कार्यकर्त्यांची पहिली पसंत होती परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत डॉ गुलवाडे यांना महानगराची जबाबदारी ही अनेकांना खटकली कारण जिल्हाध्यक्षांना शुभेच्छांचा वर्षाव करणारे अनेक बॅनर शहरात झळकले, परंतु या बॅनर मध्ये महानगर अध्यक्षांना डावलून दिले.

हे बॅनर उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांचे होते, या बॅनर मुळे कार्यकर्ते नाराज झाले असा संदेश तर वरिष्ठांना देण्यात आला की काय अशी चर्चा आज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here