दारू तस्करांवर चिमूर पोलिसांची करडी नजर, देशी-विदेशी दारूची तस्करी करणाऱ्याला केली अटक, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

0
50
Advertisements

चिमूर – दारुबंदीनंतर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर येत आहे, आणि तो आजही कायमच आहे काही प्रमाणात का होईना पोलीस या तस्करांच्या मुसक्या आवळत आहे.

सावली तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरीनंतर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांची बदली चिमूर पोलीस स्टेशनला झाली, चिमूर हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांचे धुळे आल्याने त्यांचे धाबेच दणाणले आहे.

कोरोना काळात अवैध प्रवासी वाहतुकीच्या अनेक कारवाया पोलीस निरीक्षक धुळे यांनी केल्या आता अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर लागोपाठ कारवाई चिमूर पोलीस करीत आहे.

दि. 04/07/2020 रोजी चिमूर येथे अवैद्य दारू तस्कर चंद्रगुप्त मांडवकर हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या इंडिका क्र MH40 KR 0228 मध्ये देशी विदेशी दारूचा माल विक्रीकरिता वाहतूक करून आणत आहे या माहितीवर मासळ चौक चिमूर येथे रात्रौ सापळा रचून असताना आरोपी चंद्रगुप्त रमेश मांडवकर वय 28 वर्ष रा.ठक्कर वार्ड चिमूर हा आपली इंडिका कार क्र. MH 40 KR 0228 ने येतांना दिसताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी दारूचा साटा असा एकूण 4,54,000 रु चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.

सदरची कारवाही मा. अनुप तारे , उप विभागीय पोलीस अधिकारी मूल अति.कार्यभार चिमूर , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक अलीम शेख, पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे, पोशी सतीश झिलपे , दगडू सरवदे चानापोशी कैलास वनकर यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here