राजुरा शहरात शिवसेनेला येणार अच्छे दिन, कृषिमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी तालुका प्रमुख नगरसेवक यांचा शिवसेनेत प्रवेश

0
71
Advertisements

राजुरा – जिल्ह्यात राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे हे जिल्ह्यातील कृषी संबंधी क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आले असता राजुरा शहरातील भाजपचे माजी तालुका प्रमुख अपक्ष नगरसेवक राजू डोहे व निलेश गंपावार यांनी कृषी मंत्री भुसे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

जिल्ह्यात शिवसेनेला युवा नेतृत्व मिळाल्यापासून शिवसैनिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, जिल्हाभर शिवसेनेत आता तरुण युवकांची चांगलीच पक्ष बांधणी जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

राजकारणासह चंद्रपुरात शिवसेना सामाजिककारणात चांगलीच सक्रिय झाली आहे, त्यांच्या या नेतृत्वाला भारावून असंख्य नागरिक शिवसेनेत प्रवेश घेत आहे.

एकेकाळी भाजप तालुका अध्यक्षाची धुरा सांभाळणारे डोहे हे पालिकेची निवडणूक अपक्ष लढले व त्यात त्यांचा विजय झाला, आज शिवसेना पक्षाचे तत्व मान्य करीत डोहे व गंपावार यांनी कृषिमंत्री भुसे व जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला, त्यांच्या प्रवेशने राजुरा शहरातील राजकारण तापले आहे.

शहरात शिवसेनेला आता चांगले दिवस येत आहे, पक्षप्रवेश कार्यक्रमात चंद्रपूर महानगर प्रमुख प्रमोद पाटील, युवा सेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे, बबन उरकुडे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here