कुसुंबी माईन्स क्षेत्रात बहरले शिवार, उगवले बियाणे, आदिवासी शेतकरी बांधवात आनंदाची लहर

0
60
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
माणिकगड सिमेंट कंपनीच्या बहुचर्चित जमीन भुपृष्ठ घोटाळ्याचा लढा न्यायलयापर्यंत पोहचला आहे.प्रशासनाने सुरूवाती पासूनच याप्रकरणाकडे काणाडोळा केल्याने जमीनीचे मालक “शाहु असताना चोरा सारखे” वावरत आहे.आदिवासींच्या शेतजमिनी नष्ट करून अविरत चुनखड्डी उत्खनन केल्याची अनेक तक्रारी शासनप्रशासन स्तरावर देण्यात आली मात्र साध्या चौकशीचे सौजन्य दाखविले नाही.कित्येक निवेदने धूळखात पडले असून अन्यायग्रस्त 14 आदिवासी कोलाम बांधवांचे भूपृष्ठ अधिकार भूसंपादन शेतकऱ्यांची संमती प्रक्रिया न करता तत्कालीन महसुल अधिकार्‍यांच्या संगनमताने वर्ष 2013 मध्ये आदिवासी कुंटूबांच्या 7/12 नमुन्यात 2 इतर अधिकार नियमबाह्य माणिकगड माईन्स अशी नोंद घेऊन आदिवासींच्या अधिकारावर घाला घातल्याने अन्यायाचे बळी आदिवासी ठरले तसेच शेत जमीनीचा मोबदला दिला नाही,नोकरी दिली नाही 1984 च्या अवार्ड व भुसंपादन अहवालात नाव आणि जमिनीचा उल्लेख नसताना बेकायदेशीर उत्खनन व आदिवासींच्या जमिनीवर कंपनीचा कब्जा कसा ? असे आरोप करत यामुळे आदिवासींची फसवणूक तर झालीच सोबत शासनाच्या कोट्यावधींचा महसुलावर पाणी फिरल्याची खंत आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.अनेक तक्रारींच्या तलाठी अहवाल असताना सुद्धा वरिष्ठ कार्यालय कारवाई करण्यासाठी पुढे सरसावले नाही.यामुळे जमिनीसाठी आदिवासीयांचा संघर्ष सुरू आहे.गत 3 वर्षांपासून 14 आदिवासी कुटुंबाने “माझा गाव,माझा 7/12 मीच मालक” म्हणत 70 एकर जमीनीवर कास्तकारीत चुनखडी खदान परिसरात जमीन कसून शेतीचा हंगाम सुरू करून उत्पादन घेत आहे.यावर्षी कपाशी,ज्वारी,मुंग,धान,तुरीची लागवड पेरणी केली.वरूण राजाच्या कृपेने बियाणे उगवले,शेत बहरले,हे दृश्य पाहून आदिवासी बांधवात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.भविष्यात खदानीच्या ब्लॉस्टीग दगडाने नुकसान झाल्यास खदान बंद पाडू असा इशारा सदर आदिवासी बांधवांनी दिला असून आमच्या 7/12 वर आम्हाला कर्ज मिळत आहे,पिक घेत आहे मग इतर आधिकारातून माणिकगड खदान,ही नोंद रद्द करा 7/12 मध्ये पेरे पत्रकात नोंदी घ्या,यासाठी तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती देत आम्ही शेती सोडणार नाही,मोबदला ही दिला नाही, नोकरी दिली नाही.7/12 वर मालक आम्ही तर कंपनीचा कब्जा आम्ही कसा सहन करणार असा प्रश्न शंकर आत्राम,अरूण उदे,शंभू आत्राम,बापूराव जुमनाके,महादेव कुडमेथे यांनी उपस्थीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here