भाजपाच्या कुटुंब सर्व्हेक्षण फार्मवर बिडकरांचा प्रहार, जनतेत संभ्रम निर्माण करू नये भाजप नगरसेवक डोहे यांचे बिडकरांना आवाहन

0
141
Advertisements

गडचांदूर/प्रतिनिधी:
कोरोना संकट काळात नागरिकांना मदत करण्याऐवजी कुटुंब सर्वेक्षण अहवाल गोळा करण्याची मोहीम राबवत चंद्रपूर जिल्हा भाजपा जनतेला गाजर तर दाखवत नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला असून कोणत्याही पक्षाला आपली वैयक्तीक माहिती पुरवू नये त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांनी केला आहे.सध्या जिल्ह्यातील विविध भागात भाजपतर्फे कुटुंब सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात येत आहे.त्यानुसार एक पेजचा फॉर्म तयार करण्यात आला आहे. भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन हा फॉर्म भरून घेत आहे.इतकेच नव्हे तर घरकुल,रोजगार,संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,रेशन कार्ड आदी प्रश्न या फॉर्ममध्ये विचारून प्रलोभने देण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचा आरोप बिडकर यांनी केला आहे.यामध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती,सदस्यांचे मोबाईल नंबर,व्यवसाय,वय,शिक्षण इत्यादी माहिती मागितली आहे.सध्या महाराष्ट्रात भाजप सत्तेत नाही मग ही माहिती गोळा करून नेमके काय करणार ? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.एकंदरीत आपली वैयक्तिक माहिती इतरांना देणे तसेच या प्रश्नाबाबतचे उत्तर फॉर्ममध्ये मागणे यासर्व प्रकारातून व्यक्तीच्या व्यक्तिगत मूलभूत स्वातंत्र्याचे उल्लंघन होऊ शकते.निवडणूकीच्या काळात याचा गैरवापर ही भाजपकडून केला जाऊ शकतो.लोकांना अकारण मेसेजेस,फोन करून पक्षाचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होऊ शकतो त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कुटुंबाची वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन प्रहारचे सतीश बिडकर यांनी केला आहे.
तर भाजपकडून सुरू असलेल्या “कुटुंब सर्वेक्षणात वैयक्तिक माहिती देऊ नये” असे म्हणुन नागरिकांत संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन गडचांदूर नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी प्रहारच्या बिडकरांना केला आहे.डोहे पुढे म्हणाले की,राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनप्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.याकार्यात भाजपाने सुद्धा आपले दायित्व स्वीकारून पक्षाचे संपूर्ण नेते व कार्यकर्ते शासनाला सहकार्य करीत आहे.उदाहरणार्थ गोर गरीबांना धान्यकिट,मास्क,सॅनिटायजरचे वाटप,रक्तदान,वाटसरूंना भोजन यात आमचा पक्ष कुठेही कमी पडला नाही.शासनाकडून घर सर्वेक्षण करून ताप,सर्दी,खोकला याची माहिती तसेच बाहेरून येणाऱ्यांची माहिती गोळा करणे व कॉरंटाईन करण्याचे काम प्रशासन करत आहे.त्यांना मदत म्हणून भाजपच्या कार्यकर्ते सुद्धा सदरची माहिती गोळा करणे, बाहेरून येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला देणे,शहरात अनेक कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही अशांची यादी तयार करून शासनाचे धान्य त्यांना मिळवुन देण्याचे कार्य करीत आहे.केंद्र सरकारकडून जनधन खाते धारकांना प्रतिमाह 500 रु.देण्यात आले परंतु अनेकांकडे खातेच नसल्याने ही मंडळी लाभापासून वंचित राहीली.अशांची माहिती गोळा करून भाजप कार्यकर्ते त्यांना जनधन खाते उघडून देण्यासाठी मदत करीत आहे. यात कुठलीही वैयक्तिक माहिती घेतली जात नसून ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना नवीन कार्ड बनवून देणे,ज्यांचे मतदान यादीत नाव नाही त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी मदत करणे,निराधार लोकांची यादी घेऊन त्यांना शासन योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उत्तम कार्य भाजप कार्यकर्ते करीत असून जनतेच्या आरोग्यची काळजी घेत आहे.त्यामुळेच सदर उपक्रमाला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असून हे कार्य प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष बिडकर व इतर कुठलाही पक्ष करत नसल्याने आमचे हे कार्य त्यांना पचणी पडत नसावे म्हणून ते चुकीची अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करीत असल्याचे सांगत जनतेने अशा खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता आमच्या कार्यकर्त्याला सविस्तर माहिती द्यावी.आवश्यक त्याठिकाणी आम्ही पक्षातर्फे मदत करू अशी ग्वाही सुद्धा नगरसेवक अरविंद डोहे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here