Advertisements
प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – घुग्घुस येथुन जवळच असलेल्या सिमेंटनगर वसाहतीत एसीसी कंपनीचे कामगार गोपाल नारायण चिंचकर (३५) राहते घरीच आज ४ वाजता दरम्यान पंख्याला दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली.
घुग्गुस सारख्या लहान शहरात आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, लॉकडाउन काळातच या आत्महत्या होत असताना आर्थिक समस्या असल्याचा संशय पोलिसांना आहे.
मृतक गोपाल हा शांत स्वभावाचा होता, काम आणि घर हा नित्यक्रम होता, अचानक आत्महत्या करण्याचा हा निर्णय कुणालाही न समजण्यासारखा आहे.
घुग्गुस पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करीत आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत आहे.