शेत मजुरावर वाघाचा हल्ला, हल्ल्यात मजूर ठार

0
52
Advertisements

नागभीड – :- जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मांगरूड येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास उजेडात आली. मारोती उईके (४३) मृतकाचे नाव असून तो सोनुली या गावातील आहे. मांगरूड गावातील शेतशीवारात शेतीकाम करण्यासाठी मारोती हा गेला होता. शेतशिवारात औषध फवारनीचे काम शेतात सुरु असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच वनधिकारी घटनास्थळी पोहचले, शेतशिवार परिसरात वाघाच्या वास्तव असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here