स्मार्ट ग्राम बिबी येथे स्मार्ट कार्डचे निःशुल्क वाटप, 30 जेष्ठ नागरिकांना लाभ, सरपंच, उपसरपंच यांच्या संकल्पनेतून समस्या निवारण दरबार

0
115
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून नावाजलेल्या बिबी ग्रामपंचायतच्या वतीने 65 वर्षावरील 30 जेष्ठ नागरिकांसाठी अर्ध तिकीट लागणारे एस.टी.महामंडळ बसेसचे मोफत स्मार्ट कार्ड काढून देण्यात आले आणि 3 जुलै रोजी सदर कार्डचे वितरण करण्यात आले. सरपंच मंगलदास गेडाम व उपसरपंच प्रा.आशिष देरकर यांच्या संकल्पनेतून समस्या निवारण दरबार शिबिर घेण्यात आले होते.सदर शिबिरात गावातील नागरिकांच्या इतरही समस्या सोडविण्यात आल्या.मिळालेल्या सुविधेबाबत समाधान व्यक्त करत यासाठी पुढाकार घेतलेल्या बिबी ग्रामपंचायतचे जेष्ठ नागरिकांनी आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here