पावसामुळे शेत पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी

0
57
Advertisements

गडचांदूर/प्रतिनिधी:- सैय्यद मुमताज अली
कोरपना तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पानी शिरले.यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून एकीकडे देशात कोरोनाचे संकट तर दुसरीकडे झालेले शेत पिकांचे नुकसान यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.तरी ज्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले अशांना पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी अशी मागणी अतूल गोरे,मयूर एकरे,रितीक चौधरी यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी कोरपना यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here