लॉकडाउन काळातील विजेचे बिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार – रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशनचा इशारा

0
48
Advertisements

चंद्रपूर – सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेला आहे.त्यात भारत सुद्धा कोरोनाच्या संकटात सापडलेला असून चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रथम क्रमांक आहे.मागील तीन महिन्यापासून कोरोनाचे संकट असून या मूळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेकांचे रोजगार नष्ट झालेले आहे.त्यातच मजूर, शेतमजूर,लहान लहान उद्योग धंदे.रोजगार,आणि रोज हातावर आणून काम करणारे सर्व सामान्य माणसाची महाभयंकर दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहे,त्यामुळे आर्थिक संकटातून कसे जगयाचे याचे उत्तर शोधन कठिन झाले आहे.
त्यातच या संकटाच्या सामना करताना विज वितरण कंपनीने महाराष्ट्रातील जनतेला अतोनात वीज बिल पाठविले आहे त्यामुळे सर्वत्र चिंतेचे व आक्रोशाचे वातावरण आहे. या समस्याचे निराकरण करण्यासाठी रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन वतीने अध्यक्ष राजस प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाधिकारी मार्फ़त
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री याना निवेदनातून मागणी केली आहे.
१) दरिद्रय रेषेखालील लोकाना मागील तीन महीन्याचे विज बिल माफ करावे नहितर ५०% सूट दयवि
२) बिल मध्य ६.१० प्रति यूनिट होते तर आता ७.४६ प्रति यूनिट केले आहे. हे त्वरित थांबवावे.
३) ज्या लोंकानी तिनं महिन्याच्या बिल भरले नाही त्यांना वेग वेगळे बिल दयावे.
उपरोक्त मागण्या मान्य करुण महाराष्ट्राच्या जनतेला सुखद दिलासा द्यावा ही विनंती निवेदनातून करण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे या वेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रेमदास बोरकर, प्रेरणा कर्मरकर, लुम्बिनी गणवीर, यश उमरे,संघम शेलकर, शुभम शेंडे,कपिल गणवीर, भाणेश चिलमिल, हर्शल खोबरगड़े, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here